Thursday, February 4, 2021

शुल्क नियामक प्राधिकरणाने वेतनाची प्रतिपूर्ती होते की नाही हे तपासावे.

सर्व शुल्क आणि सोयीसुविधांची माहिती महाविद्यालयांच्या संकेतस्थळावर जाहीर करणेसाठी शुल्क नियम प्राधिकरणाने उचलले पाऊल स्वागतार्ह आहे परंतु शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन दिले जाते की नाही याची देखील तपासणी प्राधिकरणाने केली पाहिजे. 

अन्यथा हॉटेलमध्ये लावलेल्या फलकांप्रमाणे आम्ही देखील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन नियमित देतो असे फलक संकेतस्थळावर जाहीर करणेसाठी महाविद्यालयांना बंधनकारक करावे. 

दुर्दैव आहे की सरकारसह राज्यातील एकही प्राधिकरण वेतनाची प्रतिपूर्ती होते की नाही हे तपासत नाही आणिआम्ही गप्पा मारतो गुणवत्तेच्या. 

प्रा. (डॉ.) वैभव नरवडे 

महामंत्री - अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ, महाराष्ट्र प्रांत तथा

अध्यक्ष - मुक्ता शिक्षक संघटना



Tuesday, January 19, 2021

अभियांत्रिकी महाविद्यालयांचे दैनंदिन अर्थचक्रच बिघडले - लोकमत

वेतन मिळत नसल्याने घर चालविणे कठीण झालेल्या प्राध्यापकांसाठी मुक्ता या शिक्षक संघटनेने दिशा हे अभियान सुरू केलेले आहे. प्राध्यापकांना त्यांच्या कौशल्यानुसार काम मिळवून देणेसाठी या अभियानात प्रयत्न केले जाणार आहेत. या संपूर्ण अभियानता ट्रेनीग्न आणि प्लेसमेंट अधिकारी डॉ. प्रशांत लोखंडे सर यांची महत्वाची भूमिका आहे. 

-- डॉ. वैभव नरवडे, 

अध्यक्ष - मुक्ता शिक्षक संघटना  

महासचिव - अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ, महाराष्ट्र प्रांत