Sunday, March 7, 2010

मंगळवार दि. ०९/०३/२०१० रोजीच्या उपोषणाबाबत....

प्रति,
मा. कुलगुरू
मुंबई विद्यापीठ, फोर्ट, मुंबई

विषय :मंगळवार दि. ०९/०३/२०१० रोजीच्या उपोषणाबाबत....

सन्माननीय महोदया,

वरील विषयाच्या संदर्भात आपले तातडीने लक्ष वेधण्यात येत आहे.

विद्यापीठात अजूनही -याच समित्यांचे अहवाल सादर झालेले नाहीत. जे अहवाल सादर झालेले आहेत त्याबाबत कोणतीही कार्यवाही नाही. इतर विषय देखील प्रलंबित आहेत. काही महत्वाच्या समित्या विषयांची माहिती खालील प्रमाणे.

. परीक्षा नियंत्रकांच्या अपात्रते विषयीची समिती त्यात समिती सदस्यांचा झालेला छळ.
. सन्माननीय सदस्या समन्वयक प्रा. बालापोरिया यांचा अहवाल.
. व्ही. जे. टी. आय. चा अहवाल.
. विद्यावर्धिनी महाविद्यालयाचा सत्य शोधन समितीचा अहवाल.
. रेंगाळलेला पदवीदान समारंभ.
. अधिसभा सदस्यांच्या पत्रांना मिळणारी उत्तरे.
. माहिती अधिकार कायद्याची कुलसचिवांनी केलेली थट्टा.

वरील सर्व विषयांबाबत आपणास कल्पना आहेच. तरीदेखील आपण कुठलीही ठोस कार्यवाही अद्याप केलेली नाही. आपण वर दिलेल्या सर्व मुद्यांवर येत्या मंगळवारी(०९/०३/२०१०) होणा-या व्यवस्थापन परिषदेत कार्यवाही करणेसाठी, आपले सन्माननीय सदस्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी मी मंगळवार दि. ०९/०३/२०१० रोजी विद्यापीठात लोकशाही मार्गाने उपोषणास बसत आहे याची कृपया नोंद घ्यावी ही विनंती.
विद्यापीठ वरील सर्व विषयांकडे गांभीर्याने पाहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. अन्यथा विद्यापीठ प्रशासनाने चाललेला शिक्षणाचा बाजार उघड्या डोळ्यांनी पाहत बसावा आपणही माजी. कुलगूरूंप्रामाणे अधिका-यांना पाठीशी घालण्यात धन्यता मानावी.

धन्यवाद.

आपला

वैभव नरवडे (अधिसभा सदस्य- मुंबई विद्यापीठ)
दिनांक : 08/03/2010

प्रत रवाना :- 1. मा. कृ.व्यंकटरमणी- कुलसचिव, मुंबई विद्यापीठ
2. मा. डॉ. वि. . मगरे - संचालक बी. सी. यु. डी., मुंबई विद्यापीठ