मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेत ठरावावरून गदारोळ !
दिनांक १५ मार्च २०२२ रोजी मुंबई विद्यापीठात संपन्न झालेल्या अधिसभेत, सभा सुरु झाल्या झाल्या सेनेच्या सिनेट सदस्यांनी राज्यपालांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा सुरु केल्या. मराठवाडा विद्यापीठात राज्यपालांच्या विरोधात निषेधाचा ठराव झाला. तसाच प्रयत्न कदाचित सदस्यांचा होता. परंतु घोषणा चालू असताना मी देखील राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या विरोधाचा ठराव मांडला. विद्यापीठे हि स्वायत्त आहेत आणि विद्यापीठाच्या पैशावर मंत्री महोदयांनी जनता दरबार भरवले आहेत. स्वायत्त असणाऱ्या विद्यापीठात मंत्री महोदय हस्तक्षेप करीत आहेत म्हणून त्यांचा देखील निषेध केला पाहिजे व तसा ठराव केला पाहिजे अशी जोरदार मागणी मी केली.
एकीकडे राज्यपालांच्या विरोधात १० जण घोषणा देत होते आणि मी मंत्री महोदयांच्या विरोधात घोषणा देत होतो. सगळे जण माझ्यावर देखील तुटून पडले. अर्धा तास घमासान चालू होत. पण मी माझ्या मुद्द्यांवर ठाम होतो. शेवटी राज्यपालांचा ठराव पास झाला तर मंत्र्यांच्या विरोधात देखील ठराव पास करावाच लागला असता म्हणूनच कि काय शेवटी मा. कुलगुरूंनी दोन्ही प्रस्ताव फेटाळले आणि अधिसभा सुरळीत सुरु झाली. आणि हि बाब सर्वांनी मान्य केली.
सभागृहात सर्व गोंधळ होत असताना, जोरदार घोषणा बाजी होत असताना दुसऱ्या दिवशी सर्व वर्तमान पत्रात फक्त राज्यपालांच्या निषेधाची चर्चा आली. मंत्री महोदयांच्या निषेधाची चर्चाच आली नाही.
आज तरुण भारत या पेपर ने याची दखल घेतली. त्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार. गेल्या दोन दिवसात अनेक मुद्दे शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून मी मांडले त्याची सविस्तर माहिती देखील शिक्षकांपर्यंत पोहचविली जाईल.
अन्य सर्व वर्तमानपत्रातून विविध मुद्द्यांची देखील प्रसिद्धी अन्य पत्रकार बंधूंनी दिली त्या सर्व पत्रकार बंधू - भगिनींचे आभार. !
No comments:
Post a Comment