Saturday, September 5, 2009

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!



भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा 5 सप्टेंबर रोजी जन्मदिन 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. 'शिक्षक' हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. डॉ. राधाकृष्ण यांचे शिक्षकांप्रती असलेले प्रेम व आदर पाहून भारत सरकारने त्यांचा जन्मदिन हा 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्‍याचा संकल्प केला. ती परंपरा अजूनही सुरू आहे व भविष्‍यातही सुरूच राहिल.
परंतु त्याच बरोबर हा २८ नोव्हेंबर ! हा दिवस सुद्धा आपल्याला विसरता येणार नाही. भारतीय शैक्षणिक व सामाजिक क्रांतिचे अग्रदूत महात्मा जोतिबा फुले यांचा स्मृतीदिन! बहुजनांच्या शिक्षणासाठी आपले संपुर्ण आयुष्य वाहून घेणाऱ्या या महात्म्याला त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त मनःपुर्वक आदरांजली आपण वाहिली पाहिजे. बहुजनांच्या शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणाऱ्या या महात्म्याच्या कार्याला वंदन करून २८ नोव्हे. हा दिवस सुद्धा शिक्षक दिन म्हणून आपण पाळला पाहिजे ही प्रामाणिक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो.
सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

3 comments:

Anonymous said...

नरवडे साहेब नमस्कार,
तंत्रनिकेतनातील अधिव्याख्यात्यांच्या प्रामुख्याने दोन समस्या आहेत. आपण यात लक्ष घालावं असे आपणास सुचवावेसे वाटते.
१. आम्ही संघटीत नसल्यामुळे आमच्या समस्या ऎकणारे कोणी नाही. संचालक तंत्र शिक्षण यांना आम्ही सावत्रच वाटतो. आपण संगठनात्मक काही करु शकल्यास बरे होईल.
२. पदोन्नती च्या बाबतीत सांगावेसे वाटते. २००७ मध्ये आमच्या पैकी काहिंना मिळाली पण त्याबाबतितील थकबाकी अजुन मिळायची आहे. तसेच पदोन्नतीसाठी पुढील बैठक झाळिच नाही, त्यामुळे बरेच अधिव्याख्याते त्यांना पदोन्नती मिळायची वाट बघताहेत. आपण या प्रश्नांना येथेच उत्तर द्यावे त्यानंतर आपणांस भेटून त्यापुढे काय करता येईल या बद्दल चर्चा करुया.
धन्यवाद.

वैभव said...

पदोन्नती च्या बैठक झाली नसेल तर आपण त्यांना भेटून ती बैठक घेण्याची विनंती करू. या व्यतिरिक्त अजुन काही करायचे असल्यास भेटून बोलता येईल, ते जास्त सयुक्तिक ठरेल.- वैभव

Anonymous said...

DTE staff is corrupt they dont work till they get bribe. Someone do something. ACB should catch S. N. Patil.