पेपर तपासणीचे मानधन रखडले.
"येणाऱ्या नवीन सत्राची परीक्षा सुरु झालेली आहे. त्यांचे पेपर तपासणीचे काम देखील पुढे येणार आहे. परंतु मागच्याच परीक्षेचे मानधन न मिळाल्याने शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. काम करूनही त्याचा मोबदला मिळणार नसेल तर विद्यापीठाने उगाच शिक्षकांकडून कामाची अपेक्षा करू नये याकारणे मुक्ता शिक्षक संघटनेने निवेदन विद्यापीठाला दिलेले असून सर्व शिक्षकांचे मानधन लवकरात लवकर देण्याची व्यवस्था करण्याची लेखी विनंती केली आहे.
विद्यार्थी आणि पालकांचा रोष ओढवून घेणाऱ्या विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी किमान आता शिक्षकांच्या रोषाला सामोरे जाऊ नये असे मुक्ता शिक्षक संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. वैभव नरवडे यांनी सांगितले आहे. तसेच ज्या-ज्या शिक्षकांना मानधन अद्याप मिळालेले नाही त्यांनी मुक्ता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन देखील संघटनेने केले आहे."

No comments:
Post a Comment