Thursday, May 28, 2009

विद्यापीठातील भ्रष्टाचाराच्या सीबीआय चौकशीची मागणी...

शहापूर येथील एका बी. एड. महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाची मान्यता मिळवून देण्यासाठी त्या बदल्यात संबंधित संस्थाचालकाकडून लाच घेताना मुंबई विद्यापीठाच्या संलग्नता विभागाचे उपकुलसचिव प्रकाश गोसावी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली.

हे महाविद्यालय सुरू करण्याची मंजुरी राज्य सरकारने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दिली होती. या महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाची संलग्नता मिळण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्षांनी विद्यापीठात अर्ज केला होता. यानंतर विद्यापीठाच्या स्थानिक चौकशी समितीने डिसेंबर 2008 मध्ये महाविद्यालयाचे निरीक्षण करून जानेवारीमध्ये विद्यापीठाला अहवाल दिला होता. परंतु, महाविद्यालयाने अनेक निकष पूर्ण केले नसल्याने समितीने विद्यापीठाला नकारात्मक अहवाल सादर केला होता. परंतु, हा अहवाल हवा तसा करून संस्थेला झुकते माप देण्याचे आश्वासन गोसावी यांनी दिले. त्यासाठी त्यांनी ५० हजार रूपयांची लाच मागितली. त्यापैकी १० हजाराचा पहिला हप्ता संस्थाचालकांनी यापूर्वीच दिला होता. उरलेली रक्कम घेत असतानाच सापळा रचलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गोसावी यांना रंगेहाथ पकडले. या घटनेचे तीव्र पडसाद शिक्षणक्षेत्रात उमटले आहेत.

गोसावींना झालेली अटक म्हणजे कुलगुरू उपकुलगुरू यांच्या कारभाराला काळीमा फासणारी त्यांच्या नाकर्तेपणाचे दर्शन घडविणारी घटना आहे, विद्यापीठाच्या या अशा अनेक गैरप्रकारांबाबत काही मोजकेच अधिसभा सदस्य नेहमी वाचा फोडत असतात, लेखी निवेदने देत असतात, पण बुरखा पांघरलेल्या कुलगुरू-उपकुलगुरूंवर त्याचा काहीही परिणाम होत नाही किंबहुना हेच उच्चपदस्थ अशा अधिकाऱ्यांच्या चुकांवर पांघरूण घालतात, असा आरोप 'मुक्ता'ने केला आहे.विद्यापीठातील या भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्यासाठी कुलगुरू, प्र-कुलगुरू,कुलसचिव, तसेच परीक्षानियंत्रक यांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी आम्ही करीत आहोत.


4 comments:

Anonymous said...

Namaskar,

When will College professors in Maharashtra (professors in govt. aided colleges) get 6th Pay Commission? From what I heard is that UGC has approved the 6th pay recommendations and now state govt needs to follow guidelines given by UGC. IS this correct?

When the actual 6th pay will be given to professors? What is the procedure for that and at what stage is the process as of now?

वैभव नरवडे said...

Dear Sir,
"The VI pay to teachers": issue shall come for discussation in the assembly starting from tomorrow. Teachers are likely to get VI pay in the salary of june paid in july.

Anonymous said...

नरवडे साहेब नमस्कार,
आपण फक्त मुंबई विद्यापीठ अधिसभा सदस्य म्हणून कार्यरत राहू ईच्छिता की एकूण शिक्षकांच्या समस्याही हाताळू ईच्छिता ?
तंत्रशिक्षण संचालनालयात शिक्षकांना अत्यंत खालच्या दर्जाची वागणूक दिली जाते याबद्दल आपण काही करावे असे वाटते.
आम्हाला सहावा वेतन आयोग कधि मिळणार याबद्दल काही माहिती आहे कां ?

वैभव नरवडे said...

अहो साहेब वैइगरे काही म्हणू नका. मी तुमच्या सारखाच आहे...तंत्रशिक्षण संचालनालयात आपल्या शिक्षकांना काही खालच्या दर्जाची वागणूक दिली जात असेल तर आपण अवश्य संचालकांना भेटून त्यांच्या कानावर घालू.....तुम्ही म्हणाला तेंव्हा आपण जाऊ.....