Thursday, January 22, 2009

अभ्यांगत अध्यापकांनसाठी शासनाचे परिपत्रक

दिनांक :

प्रति,

कुलसचिव,

मुंबई विद्यापीठ

फोर्ट, मुंबई


विषय : मुंबई विद्यापीठातील अभ्यांगत अध्यापकांना ( Clock Hour Basis- CHB Lecturers) सुधारित मानधन लागू करण्याबाबत....

महोदय,

वरील विषयाच्या अनुषंगाने मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की महाराष्ट्र शासनाने दि. 5 नोव्हेंबर 2008 रोजी अभ्यांगत अध्यापकांसाठी सुधारित मानधनाचे पत्रक काढले आहे. आज दोन महिने होऊन देखील अध्यापकांना जुनेच मानधन मिळत आहे. मुंबई विद्यापीठातील सलग्ण महाविद्यालयात अभ्यांगत अध्यापकांची संख्या जवळपास 1000 च्या आसपास आहे. तरी या सर्वाना सुधारित मानधन मिळणेसाठी आपण त्वरित परिपत्रक काढावे व सलग्ण महाविद्यालयाना तश्या सूचना द्याव्यात ही विनंती. जेणे करून त्याचा लाभ सर्वाना होईल.

आपण केलेल्या कार्यवाहीची एक प्रत मला सुद्धा देण्यात यावी.

धन्यवाद.

आपला

वैभव नरवडे, सुभाष आठवले

अधिसभा सदस्य- मुंबई विद्यापीठ

सोबत:- महाराष्ट्र शासनाचे दि. 5 नोव्हेंबर 2008 रोजीचे परिपत्रक जोडत आहे

प्राध्यापकांसाठी : परिपत्रक कोणाला हवे असल्यास अवश्य संपर्क साधावा . मी ते तुम्हाला ई-मेल करीन

2 comments:

Anonymous said...

अभ्यांगत की अभ्यागत?

वैभव नरवडे- अधिसभा सदस्य said...

अभ्यागत असायला पाहिजे परंतु मराठी टायपिंगची सवय नसल्याने चुका होतात त्या समजून घ्याव्यात. शासनाच्या पत्रकात सुद्धा काही ठिकाणी चुका आहेत. परंतु मुळात विषय काय आहे तो समजला म्हणजे झाल. असो चुक भूल द्यावी घ्यावी. आपण वाचून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.