Sunday, November 9, 2008

सिनेट सभेचा पहिला अनुभव

विद्यापीठाच्या सिनेट सभाग्रहाची रचना ही साधारणत: विधानसभेच्या सभाग्रहासारखीच असते. २२ आक्टोंबर ०७ रोजी सिनेट होती.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मुक्ताचे (मुंबई यूनिवर्सिटी कॉलेज टीचर्स असोसिएशन) आम्ही तिघेजन म्हणजे मी, सुभाष आठवले आणि भगवान चक्रदेव असे नव- नियुक्त सिनेट सदस्य होतो. अर्थात इतरही प्राध्यापक आमच्या बरोबर होते परंतु कित्येक वर्षांचा अनुभव त्यांच्या पाठीशी होता. आम्हाला मात्र सर्व नवीन होत.

सभाग्रहात
गेल्या गेल्या प्रथम कुठे बसायचे हे ठरवून घेतल. समोरील आसनावर मा. कुलगुरू, त्यांच्या डाव्या बाजूला मा. प्र-कुलगुरू, उजव्या बाजूला मा. कूलसचिव, बरोबर त्यांच्या मागे थोड्या जागेचे अंतर ठेऊन सर्व उप-कूलसचिव, परीक्षा नियंत्रक, वित्त अधिकारी बसलेले होते. त्या सर्वांच्या बाजूला पत्रकारांसाठी बसण्याची व्यवस्था होती. कुलगुरूंच्या डाव्या व उजव्या बाजूने रांगेत एका मागोमाग एक बसण्याची व्यवस्था होती. समोर साधारणत: गोलाकार स्वरुपात काही आसन व्यवस्था होत्या. प्रत्येक आसना समोर माईक होते.

जन-गण-मन ने सभेला सुरूवात झाली. सुरूवात झाल्या झाल्या मा. जितेंद्र आव्हाड सो. नी विद्यापीठाच उपकेन्द्र ठाण्याला अजूनही सुरू झाल नाही म्हणत चर्चेला सुरूवात केली. इतरही सिनेटर्स चर्चेत सहभागी झाले. पॉइण्ट ओफ ओर्डर, पॉइण्ट ओफ इन्फर्मेशन म्हणत सदस्य प्रशासनाला धारेवर धरत होते.प्रथम मला काही समजलच नाही काय चालू आहे ते. बोलण्याची परवानगी कश्याप्रकारे मिळवायची हे मी बारकाईने पाहु लागलो आणि हळू हळू समजत गेल.मधेच निवडणूक लागली. निवडणुकीला नामांकन दिली गेली. निवडणुकीची तयारी चालू असेपर्यंत पराग वेदक यांनी स्थगन प्रस्ताव मांडला, विषय होता "विद्यापीठाचा कासवाच्या गतीचा कारभार" . त्यात म.न.से.चे प्रकाश दरेकर यांनी इशारा दिला की, " मराठी अस्मिता पणाला लागल्यावर महाराष्ट्रात काय होत. हे आपण गेल्या ३-४ दिवसांपासून पाहत आहोत."

माझ्याकडे जवळपास दहा बारा मुद्दे आणि दोन स्थगन प्रस्ताव होते. मा.कुलगुरू, प्र-कुलगुरू मांडलेल्या प्रस्तावावर आश्वाशन देत होते. त्या अनुषंगाने येणार इतर माहिती देत होते. माया भाटकारांनी अनुमोदन दिल्यानंतर मला सूर गवसला. माईक हातात घेतल्यानंतर मी एक एक मुद्दे मांडण्यास सुरूवात केली. त्यावर साधक बाधक चर्चा झाली. दुपारी जेवणानंतर मतदान झाले. दरम्यानच्या काळात एक विद्यार्थ्यांचा मोर्चा विद्यापीठाच्यागेट वर येऊन धडकला. मतमोजणीत मी विद्यार्थी तक्रार निवार समितीवर निवडून आलो. तेथेसुद्धा ज्यानी मला मदत केली. त्या सर्वांचे मनापासून आभार.परंतु निवडणुकीत एका जागेसाठी समसमान मते मिळाल्यानंतर निर्णायक मत मा.कुलगुरूंनी दिले. हे काही प्राध्यापकाना न पटल्याने त्यांनी विद्यापीठाचा निषेध करीत सभात्याग केला.

त्यानंतर मा. कुलगुरूंनी मला माझे स्थगन प्रस्ताव मांडण्यास सांगितले.तेंव्हा संध्याकाळचे सात-साडेसात वाजले होते. माझे दोनही स्थगन प्रस्ताव मी अतिशय उत्साहाने मांडले. अर्ध्या अर्ध्या तासाची दोन भाषणे दिली ठोकून. त्या विषयी मी सविस्तर देणारच आहे. विषय पत्रिके वरील इतरविषयांवर् त्यानंतर चर्चा झाली. तो पर्यंत रात्रीचे साडे आठ वाजले होते. पत्रिकेवरील सर्व विषय संपल्यानंतर राष्ट्रगीताने सभाग्रहाची सांगता झाली.

मला मिळालेला कार्यकाल हा दीड वर्षाचा असल्याने हा कार्यकाल म्हणजे माझ्या दृष्टीने २०-२० चा सामना. तुमच्या सर्वांच्या सहकार्याने मी यात यशस्वी होईल यात वादच नाही. एकंदरीत पहिलाच अनुभव चांगला गेला अस म्हणायला हरकर नाही. तूर्त एवढेच.

धन्यवाद!!!
आपला,
वैभव

Friday, November 7, 2008

का म्हणून कुणाला घाबरायचे?

भीती हा तुझ्या मनाने तयार केलेला राक्षस आहे. नकारात्मकतेचा प्रवाह. प्रत्येक वेळी त्याने तुला काहीही क्रिया करण्यास अडथळा आणलेला आहे. आणि तू त्या आगीत इंधनच ओतले आहेस. पण तू जेव्हा तुझ्या भितिवर विजय मिळवशील तेव्हाच जीवनावर विजय मिळवशील.

सगळ्यात चांगला उपाय म्हणजे ज्या गोष्टी करायला तू घाबरतोस त्याच करायच्या. भीतीचे शास्त्र समजून घे. ती तुझी स्व:तची निर्मिती आहे. जशी दुसर्‍या कुठल्याही गोष्टीची तुझी निर्मिती तू नष्ट करतोस, फाडून टक्तोस, तशी भीती नष्ट कर. ही तुझी क्रिया तुला अमर्याद आत्मविश्वास, आनंद आणि मन:शांती देईल.